Categories: क्राईम

इंदापूरच्या लामजेवाडीत घरफोडी, दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून 1 लाख 77 हजारांचा ऐवज लंपास

सागर जगदाळे

इंदापूर

इंदापूर तालुक्यातील लामजेवाडीतुन १,७७,५०० रुपयांचा ऐवज लंपास
भिगवण : सागर जगदाळे
इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी या गावात शनिवारी(दि.१६)च्या  संध्याकाळी  चोरट्यांनी लोखंडी कोयत्या सारख्या हत्याराचा धाक दाखवून एका दाम्पत्याला लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत विनायक प्रकाश शेलार (वय ३६ वर्षे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भिगवण पोलीस सूत्रांकडून  मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारच्या रात्री दोनच्या दरम्यान  अज्ञात तीन चोरट्यांनी शेलार दाम्पत्याच्या  घराच्या दरवाजाचे  कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. शेलार दाम्पत्याला याची चाहूल लागल्यानंतर ते जागे झाल्यावर  चोरट्यांनी शेलार दाम्पत्याच्या चेहऱ्यावर बॅटरी दाबून त्यांना लोखंडी कोयत्या सारख्या हत्याराचा धाक दाखवून  घरातील  बेडरूममधील कपाटे उचकटून १९ हजार रुपये रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ए५० असा सर्व मिळून १,७७,५०० रुपयांचा  ऐवज  जीवे मारण्याची धमकी देऊन चोरून नेला आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  कदम हे अधिक तपास  करीत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

5 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

18 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

20 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

22 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago