अमृत भारत योजनेमध्ये दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश, स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार

अख्तर काझी

दौंड : रेल्वे मंत्रालयाच्या अमृतभारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये सोलापूर विभागातून दौंड रेल्वे स्थानकासह इतर दहा रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असल्याने या स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय अभियंता( परिचालन) गजानन मीना यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

कोपरगाव, नगर, कुर्डूवाडी, सोलापूर, शहाबाद, गुलबर्गा, वाडी, लातूर, पंढरपूर आणि उस्मानाबाद या रेल्वे स्थानकांचाही अमृतभारत स्टेशन योजनेमध्ये समावेश आहे. या योजनेअंतर्गत दौंड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी तब्बल 44 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे दौंड रेल्वे स्थानकाचा कायापालटच झाल्याचे दिसणार आहे. विमानतळावर ज्या पद्धतीच्या सेवा सुविधा प्रवाशांना दिल्या जातात त्या धर्तीवर या रेल्वे स्थानकांवरही त्याच पद्धतीच्या सेवा सुविधा प्रवाशांना देण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. प्रवाशांच्या सर्व अडचणी विचारात घेऊन त्याप्रमाणे सुविधा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने येथील फलाटांमध्येही मोठे बदल करण्यात येणार असल्याचे मीना यांनी सांगितले. अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये, देशात सर्वात जास्त सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांचा(11) समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. अमृत भारत स्टेशन योजनेचा उद्घाटन समारंभ दि. 6 ऑगस्ट रोजी (स.9वा.) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.

त्या अनुषंगाने दौंडकर नागरिकांनीही या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने दौंड रेल्वे प्रशासनाने, दौंड रेल्वे स्टेशन( आरक्षण खिडकी) प्रांगणात सदरच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची सोय करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गजानन मीना यांनी केले आहे. दौंड रेल्वे स्टेशन प्रबंधक जयंत त्रिपाठी, पवन कोल्हे (SSE), आरपीएफ अधिकारी सोलंकी, वाणिज्य निरीक्षक सुधाराणी आदी उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago