सुधीर गोखले
सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाची’ घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्याचाच एक भाग असलेल्या आणि पर्यटन आणि सांस्कृतिक विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘नमो तीर्थस्थळ सुधारणा’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यभरात राबवला जाणार आहे.
राज्यभरातील ७३ महत्वाच्या अशा ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार असून सांगली जिल्ह्याचा या योजनेमध्ये समावेश झाला आहे. सांगली जिल्ह्यातील ५ ऐतिहासिक धार्मिक स्थळांचे यानिमित्ताने संवर्धन होईल. “नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान” राबवुन ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जिर्णोद्धार, प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभिकरण व स्वच्छता आदी कामे या अभियानातुन करण्यात येणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माहुली येथील श्री काळम्मादेवी मंदिर, मिरज तालुक्यातील बेळंकी येथील श्री महादेव मंदिर, कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील पुरातन महादेव मंदिर, तर कुची येथील महादेव मंदिर परिसराचा समावेश आहे. या सर्व ठिकाण ची विकासकामे लवकरच सुरु होणार असून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत हि कामे पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले आहे.