दौंडमध्ये प्रांत कार्यालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न | मोदींशिवाय पर्याय नाही हे दाखवून दिले, संजय राऊतांच्या डोक्यावर परीणाम झालाय, कूल यांच्या प्रयत्नांनी दौंडला नव वैभव – महसूल मंत्री विखे पाटील

अब्बास शेख

दौंड : दौंड शहरामध्ये प्रलंबित असलेल्या महत्वाच्या प्रश्नांपैकी एक असलेल्या प्रांत कार्यालयाचे उदघाटन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते पार पडले. यावेळी विखे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये विविध मुद्दे मांडले आणि पत्रकारांनी संजय राऊत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय पण त्यांचे प्रश्न विचारून तुम्ही का परिणाम करून घेत आहात असे खोचक विधान केले.

आमदार राहुल कूल यांचे कार्य कौतुकास्पद, राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय.. विखे पाटील दौंड तालुक्यात सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या प्रांत कार्यालयाचे आज उदघाटन महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी बोलताना महाविकास आघाडीच्या मागील कामकाजावर चौफेर टिका केली. संजय राऊत यांच्या विचारलेल्या प्रश्नाबद्दल त्यांनी राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही हे तीन राज्याच्या निकालावरून जनतेने दाखवून दिले असे ते म्हणाले. तर दौंडचे आमदार राहुल कूल यांच्या अथक परिश्रम आणि पाठपुराव्याने दौंडला प्रांत कार्यालय मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला महसूल मंत्री विखे पाटलांसह माढा लोकसभेचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर, दौंड चे आमदार राहुल कूल, माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित होते.

आमदार राहुल कूल यांची माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर टिका कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रांत कार्यालयाचे उदघाटन पार पडल्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये आमदार राहुल कूल यांनी आपण केलेल्या कामांची माहिती दिली तसेच यापुढे करण्यात येणाऱ्या कामांचीही यादी त्यांनी वाचून दाखवली. आमदार राहुल कूल यांनी आपल्या भाषणामध्ये 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देत माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर नाव न घेता टिका केली आणि मला १ लख ३ हजार मते पडतात मात्र पुढील उमेदवाराला (थोरातांना) मात्र  १ लाख २ हजार मते पडतात याचे आश्चर्य वाटत असल्याचे सांगत नेमकं त्यांनी असं केलं तरी काय कि त्यांना इतकी मते पडतात असा सवाल उपस्थितांना केला. आणि यापुढे मात्र अशी परिस्थिती राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

आमदार राहुल कूल यांच्यावर स्तुतीसूमने आमदार जयकुमार गोरे यांनी आ. कूल यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे दौंडला प्रांत कार्यालय आणि विविध योजना आणता आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनीही आमदार राहुल कूल यांच्या कामाची स्तुती केली. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अजय मोरे, प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुणकुमार शेलार आणि तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.