Daund| देऊळगावराजे येथील ग्रामसभा खेळीमेळीत, ‘या’ मुद्द्याने वेधले सर्वांचे लक्ष

राहुल अवचर

देऊळगावराजे : देऊळगावराजे ग्रामपंचायतच्यावतीने तसेच सरपंच स्वाती गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा अतिशय खेळीमेळीत पार पडली. या सभेमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती मार्फत असणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामसेवक अमीर शेख यांनी दिली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे गोपाळ ताठे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपचार होणाऱ्या आजारांची माहिती दिली तसेच यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्या असून त्यांच्या जागी अजून दुसरे अधिकारी मिळाले नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधून याची खंतही व्यक्त केली. यावेळी सरपंच स्वाती गिरमकर यांनी सांगितले की प्राथमिक आरोग्य केंद्र मधील कमी असलेल्या अधिकाऱ्यांबाबत तातडीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात येईल तसेच कृषी सहाय्यक ज्योती भोसले यांनी कृषीच्या विविध योजनांची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांना शेतीविषयक अवजारे आणि खते बी बियाणे यांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी राज्य शासनाच्या वेबसाईट वरती अर्ज भरण्यात यावा मग त्याद्वारे लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच नारायण गिरमकर, ग्रामपंचायत सदस्य बाबू पासलकर, पंकज बुराडे, सुलोचना तावरे, शुभांगी गिरमकर, माजी सरपंच अमित गिरमकर, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश अवचर, पोलीस पाटील सचिन पोळ, दस्तगीर इनामदार, विष्णू सूर्यवंशी, मदन खेडकर, रोहन गिरमकर, हरी अवचर, सुशांत पवार, रोहित मस्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते.