Categories: क्राईम

दौंडमधील हाणामारी, ॲट्रॉसिटी प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात हिंदू जन आक्रोश आंदोलन,48 तासात आरोपिंना अटक करण्याची मागणी

अख्तर काझी

दौंड : शहरातील कुंभार गल्ली परिसरात राहणाऱ्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाने गंभीर वळण घेतले. या प्रकरणांमध्ये मा. नगराध्यक्ष बादशाह शेख सह इतर वीस लोकांविरोधात ॲट्रॉसिटी व इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद दौंड पोलिसांनी केली आहे. मात्र आरोपींना अटक करण्यात दौंड पोलिसांना अपयश येत असल्याच्या विरोधात आज दि. 17 नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली दौंड पोलीस स्टेशन समोर हिंदू जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे आंदोलन होत असल्याने तणावपूर्ण शांतता होती. या प्रकरणातून शहरात नक्की काय होणार असे भीतीयुक्त वातावरण तयार झाले आहे.

आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांची भेट घेऊन प्रकरणाच्या तपासाविषयी माहिती घेतली व येत्या 48 तासांमध्ये बादशाह शेख सह इतर आरोपींना अटक करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला.
पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे म्हणाले की, या शहरातील हिंदू -मुस्लिम समाजामध्ये आम्हाला तेढ निर्माण करावयाची नाही, येथील मुस्लिम समाजाला आम्हाला त्रास द्यायचा नाही पण तुम्हाला त्रास होणार नाही तसा येथील हिंदू समाजालाही त्रास होणार नाही याची काळजी येथील मुस्लिम समाजातील जबाबदार व्यक्तींनी घ्यावी. या ठिकाणी फक्त हिंदू समाजावर जर कोणी अत्याचार करणार असेल तर यापुढे आम्ही शांत बसणार नाही हे येथील पोलिसांनी चांगलेच ध्यानात घ्यावे.

येथील हिंदू खाटीक समाजाच्या दोन कुटुंबावर अत्याचार, अन्याय झाला आहे त्यामुळे येथील हिंदू समाजात भीतीचे वातावरण आहे. येथील काही मोजक्या पोलीस अधिकाऱ्यांनी या भीतीयुक्त वातावरणाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्याच्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व हिंदू समाजाला एक आमदार म्हणून नाहीतर एक हिंदू म्हणून मी ताकद व हिम्मत देण्यासाठी येथे आलो आहे. पीडित कुटुंबीयांशी येथील पोलीस अधिकारी जे वागले ते संपूर्णपणे चुकीचे आहे. समोरचा आरोपी, त्याच्यावर केस दाखल झाल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला बोलाविले जाते, पीडित महिलेच्या समोर बसविले जाते व पीडित महिलेला विचारले जाते की याच्या विरुद्ध तुला तक्रार द्यायची आहे का? हे चुकीचे आहे.

या प्रकरणातील आरोपींनी शहरात दहशतीचे वातावरण केले आहे, त्यांचे पोलिसांबरोबर लागेबांधे आहेत याची माहिती आमच्याकडे आहे. परंतु या आरोपींनी समजून घ्यावे की कोणाच्या राज्यात ते हा प्रकार करीत आहेत. यापुढे येथील हिंदूंवर जर कुठल्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार केला तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल, हे हिंदुत्ववादी विचाराचे सरकारचे राज्य आहे हे लक्षात घ्यावे. आरोपींना फरार म्हणून दाखविले आहे, आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत, आमच्याकडे या घटनेचे पुरावे आहेत, आरोपींना अटक करा असे आम्ही सांगत आहोत, तो कुठे आहे, कसा आहे याची आम्हाला माहिती आहे आणि काही पोलिसांनाही माहिती आहे. म्हणून यापुढे 48 तासांमध्ये जर बादशहा शेख यांना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे राणे म्हणाले. या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी राणे यांनी केली तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचविणार असल्याचेही राणे म्हणाले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago