Categories: राजकीय

केडगावमध्ये कुल, थोरात गटाला धक्का, बाळासो कापरे गटाच्या पूनम बारवकर विजयी

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथील तिरंगी लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. या अटीतटीच्या लढतीमध्ये बाळासो कापरे यांच्या पॅनलचे सरपंच पूनम गौरव बारवकर यांचा 544 मतांनी विजय झाला आहे. पूनम गौरव बारवकर यांना 3,940 अश्विनी शिवाजी शेळके यांना 3,396 तर वनिता मनोज शेळके यांना 1,760 मते पडली आहेत.

केडगावच्या सहा वार्डमध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले होते. यामध्ये कुल, थोरात, कापरे पॅनलमध्ये सरळ लढत पहायला मिळाली. देशमुख मळा येथे वनिता मनोज शेळके, पाटील निंबाळकर वस्ती येथे मोठी तर केडगाव गावठाण वार्डमध्ये थोडीफार आघाडी अश्विनी शिवाजी शेळके यांनी घेतली. तर हंडाळवाडी, धुमळीचा मळा, केडगाव स्टेशन येथे पूनम गौरव बारवकर यांनी आघाडी घेत विजय मिळवला.

केडगाव येथे गेली दहा वर्षे कुल गटाची एकहाती सत्ता होती त्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम बाळासो कापरे यांनी केले असल्याचे दिसत आहे. कापरे यांच्या पॅनलचा फटका कुल गटापेक्षा थोरात गटाला जास्त प्रमाणात बसला असल्याचे दिसत आहे. जर हा पॅनल एक असता तर केडगाव गावठाण व इतर ठिकाणी सदस्य संख्या ही जास्त वाढली असती असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

मुस्लिम उमेदवार पडल्याने नाराजी.. केडगाव ग्रामपंचायतच्या इतिहासात आजपर्यंत मुस्लिम उमेदवार निवडून आलेला नाही. यावेळी केडगाव ग्रामपंचायतला बाळासो कापरे यांच्या गटाकडून जबीन ताहेर शिकिलकर या मुस्लिम उमेदवार उभ्या होत्या. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला तर त्यांच्या पॅनलचे संदीप राऊत, शैलजा पितळे हे उमेदवार निवडून आले. जबीन शिकिलकर यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने केडगाव स्टेशन येथील मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

10 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

12 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

13 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

21 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago