जवाहरलाल विद्यालयात मुलीच ठरल्या ‘श्रेष्ठ,’ 96.20% मिळवून ‘साक्षी गिरी’ प्रथम तर या ‘पाच’ जणांनीही दाखवली चुणूक

दौंड : दौंड तालुक्यातील जवाहरलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १०वी चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कु.साक्षी दशरथ गिरी या मुलीने सर्वात जास्त ९६.२०% शेकडा गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिच्या खालोखाल कु.प्रेरणा सुनिल देशमुख (९५.४०%) हीचा द्वितीय तर कु.समृद्धी दिलीप शिंदे (८९.८०%) हीचा तृतीय क्रमांक आला आहे.

तर चौथ्या स्थानावर अमर पांडुरंग जोगदंड (८९.२०%) पाचव्या स्थानावर कु.श्रावणी विनायक शेळके (८८.४०%) आणि
सहाव्या स्थानावर जयदीप संतोष शेळके (८७.००%) यांनी बाजी मारली आहे.
केडगाव परिसरातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात एकूण १५१ विद्यार्थ्यांनी १०वी ची परीक्षा दिली होती. त्या पैकी १३७ विद्यार्थी पास झाले आहेत. तर १४ विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे शाळेचा शेकडा निकाल हा ९०.७२% इतका लागला असून १५१ पैकी १३७ विद्यार्थी पास झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे.