दौंड : दौंडला महायुतीचा धर्म मित्र पक्षांनी पाळावा असे आवाहन भाजप चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी केले आहे. तशी विनंती आपण वरिष्ठांकडे करणार असल्याची माहिती हरिभाऊ ठोंबरे यांनी दिली आहे
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळला असून महायुतीतील मित्र पक्षांनी आता महायुतीचा धर्म पाळावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून वीरधवल जगदाळे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला मदत करणे गरजेचे आहे. राज्यात असलेली महायुती दौंड तालुक्यात देखील कायम राहिल्यानंतर दौंड चे महायुतीचे उमेदवार राहुल कुल हे मोठ्या फरकाने निवडून येतील त्यामुळे मित्र पक्षांनी महायुती बरोबर राहणे आवश्यक आहे.
राज्यभरात महायुतीला पोषक वातावरण असून दौंड तालुक्यातील महायुती सध्या भक्कम स्थितीत आहे. महायुती मधील सर्वच मित्र पक्षांनी एका विचाराने काम केल्यास दौंड चा निकाल ऐतिहासिक असेल. या ऐतिहासिक निकालाचे साक्षीदार होण्यासाठी महायुतीमधील मित्र पक्षांनी सहकार्य करावे अशी मागणी आपण महायुती मधील घटक पक्षातील वरिष्ठांना करणार असल्याचे शेवटी हरिभाऊ ठोंबरे यांनी सांगितले.