दौंड मध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने गणेश मूर्तींना पर्यावरण पूरक रंग देण्याच्या स्पर्धेचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : राष्ट्रीय हरित सेना (शेठ जोतिप्रसाद विद्यालय)च्या वतीने पर्यावरणपूरक शाडू माती गणेशमूर्ती रंगविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेठ जोतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने शाडू मातीच्या कच्च्या गणेशमूर्तींना पर्यावरण पूरक रंग देणे स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी भीमथडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गोविंदअग्रवाल, सहसचिव बबन सरनोत, चेअरमन विक्रम कटारिया, सदस्य भूपेंद्र शहा, प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव लोणकर, आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे हे गेल्या 15 वर्षापासून पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा तसेच शाडू माती गणेशमूर्ती रंगवणे स्पर्धा घेत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव व जागृती निर्माण होऊन विद्यार्थ्यांची बालमने पर्यावरण संवेदनशील व्हावीत या उद्देशाने ही कार्यशाळा व स्पर्धा आयोजित केली जाते. शेठ जोतिप्रसाद विद्यालय, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय, दौंड आदी प्रशालेतील 51 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या तयार झालेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका रंजना मस्के, उच्च माध्यमिक विभागातील सेवाजेष्ठ शिक्षक बाळासाहेब थोरात,पर्यवेक्षक नवनाथ कदम, उपशिक्षक रामदास होले आदीच्या हस्ते प्रशालेतील 21बाल गणेश मंडळांना मोफत वितरित केल्या असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बालगणेश मंडळांमध्ये स्वर्गीय कि.गु. कटारिया उर्फ बाबूशेठ बोरीकर यांच्या स्मरणार्थ पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा (2023) ही घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय हरित सेना पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी अथर्व चव्हाण, कुशल बोरा,विराज पवार,ओम दळवी, निरज रेड्डी,प्रसाद बंड,वैभव जगताप, स्वप्निल राऊत ,प्रेम मरगर यांनी सहकार्य केले. शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार नितीन अष्टेकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे (11 सर्वोत्कृष्ट गणेश मूर्ती) स्वप्निल बसगोंडे ,ओम यादव ,श्रेया नांदिरे, समीक्षा वैद्य शारदा रेड्डी,वीर अहिर, सुप्रिया दसानकर, ज्ञानेश्वरी आवटे, भावना गोलांडे, धनश्री अहीर, सृष्टी वाघमारे
तसेच इयत्ता 4 थी व 5 वी मधील विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गोळ्यांपासून बाल गणेश बनवण्याची कार्यशाळा राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने घेण्यात आली होती यात एकूण 4थी च्या 27 तर पाचवीच्या 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शाडू मातीच्या गोळ्यापासून एकूण 71 लहान बाल गणेश मूर्ती बनविल्या.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago