बाल लैंगिक अपराध प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

यवत (समीर सय्यद) : अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन ती अल्पवयीन आहे हे माहित असतानासुद्धा तिच्यावर वाईट नजर ठेऊन तिचा वेळोवेळी पाठलाग करून वाईट नजर ठेवत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून  मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीवर यवत पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार आणि इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला त्रास देऊ नको असे म्हणणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांनासुद्धा आरोपीने दमदाटी केल्याचे मुलीच्या वडिलांनी आपल्या फिर्यादित नमूद केले आहे. किशोर शंकर खेडेकर असे या आरोपीचे नाव असून तो देलवडी (ता.दौंड) येथील रहिवासी आहे.

आरोपीविरुद्ध पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत असे, त्यामुळे आरोपीला मुलीच्या नातेवाईकांनी वेळोवेळी समजही दिली होती मात्र आरोपीने उलट त्यांनाच दमदाटी देऊन मुलीला त्रास देणे आणि ती अल्पवयीन आहे हे माहित असतानासुद्धा तिच्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागणे सुरूच ठेवले होते.

आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला आपल्या गाडीतून नेण्यासाठी अनेकवेळा तिचा पाठलाग केला होता. पीडितेच्या वडिलांनी याबाबत आरोपीला वेळोवेळी सांगून सुद्धा तो ऐकत नव्हता अखेर अल्पवयीन मुलीचे त्याने गाडीतून अपहरण करून तिला लॉजवर घेऊन गेल्यानंतर तिच्या वडिलांनी त्यास त्या ठिकाणी गाठून याबाबत जाब विचारला त्यावेळी त्याने त्यांनाही उलटसुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलीसोबत होत असलेला प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेल्याने अखेर पित्याने मुलींसह यवत पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध वरील प्रमाणे फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे हे करीत आहेत.