Categories: देश

तुमचे ‘आधारकार्ड’ काढून 10 वर्षे झाली आहेत! मग आता त्वरित ‘अपडेट’ करा अन्यथा…

  • दहा वर्षांपूर्वी जारी झालेल्या आधार कार्ड (Adhar Card) धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावी – युआयडीएआयचे (UIDAI) आवाहन

सविस्तर वृत्त

ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड (Adhar Card) मिळालेले आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षात कधीही ही आधार कार्ड अद्ययावत केली नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावीत, असे  आवाहन युआयडीएआयने  (UIDAI) केले  आहे.

सर्व रहिवासी आपली ओळख पटवणारी  पूरक कागदपत्रे (ओळखपत्र पुरावा आणि निवासाचा पुरावा) एकतर, माय आधार पोर्टलवर ऑनलाइन स्वरूपात अद्ययावत करू शकतात  किंवा आपल्या जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात जाऊनही  अद्ययावत करू शकतात .

गेल्या दशकभरात, भारतातील नागरिकांचे आधार कार्ड, हे सर्वत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारार्ह झाले आहे. 1100 पेक्षा अधिक सरकारी योजना आणि कार्यक्रम, ज्यात, 319 केंद्र सरकारचे कार्यक्रम/योजनाही समाविष्ट आहेत, त्यात लाभ किंवा सेवा संबंधित व्यक्तीपर्यन्त पोहोचवण्यासाठीचा पुरावा म्हणून, आधार कार्ड ग्राह्य धरले जाते. त्याशिवाय, अनेक बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था देखील ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी, आधारचा ओळखपत्र म्हणून वापर करतात.

त्यामुळे, आपला सध्याचा रहिवासी पुरावा आणि ओळखपत्र पुरावा देऊन, आधार कार्ड अद्ययावत करुन घेणे केव्हाही नागरिकांच्या हिताचे ठरू शकते.

आधारमधील कागदपत्रे अद्ययावत ठेवल्याने  आपले जीवनमान सुलभ होण्यास, उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत होते आणि अचूक प्रमाणीकरण देखील शक्य होते. युआयडीएआयने कायम रहिवाशांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. 09 नोव्हेंबर 2022 रोजी आधार (नोंदणी आणि अद्यतन) (दहावी सुधारणा) अधिनियम 2022 ची अधिसूचना हे त्याच दिशेने आणखी एक पाऊल होते.

भारतीय एकल ओळखपत्र प्राधिकरण- युआयडीएआय पुन्हा एकदा रहिवाशांना आधार डेटाबेसमधील माहितीच्या अचूकतेसाठी त्यांची कागदपत्रे अद्यायवत करण्याचे आवाहन करत असून त्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

Team Sahkarnama

View Comments

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago