Categories: राजकीय

माझा फोटो वापरला तर कोर्टात जाणार ! शरद पवार यांचा इशारा, तर छगन भुजबळ यांची मात्र वेगळीच भूमिका

अब्बास शेख

पुणे : राज्यात सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्याचे सर्वश्रुत आहे. शरद पवारांची इच्छा नसताना सुद्धा अजित पवारांनी भाजप सोबत हातमिळवणी केली! आणि येथूनच दोन गटांमध्ये राजकीय कोल्ड वॉर सुरू झाले. मात्र तरीही अजित पवार गटाकडून अजूनही फ्लेक्स, बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरला जात आहेत आणि त्यावर आता शरद पवारांनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

कोर्टात जाणार – शरद पवार | एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी शरद पवार यांना अजित पवार गटाकडून बॅनर आणि फ्लेक्सवर आपले फोटो वापरले जात असल्याचा प्रश्न विचारला आणि त्यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपले फोटो अजित पवार गटाने वापरू नये, फ्लेक्स बॅनरवर ते छापू नये असे शरद पवार यांनी सांगतानाच जर तरीही माझे फोटो ते वापरत असतील तर मग आता आम्ही कोर्टात जाणार आहोत असा इशाराच त्यांनी अजित पवार गटाला देऊन टाकला आहे.

फोटो लावणारच, ते रागात बोलले असतील – छगन भुजबळ | शरद पवार यांनी फोटो बाबत इशारा दिल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे आमचे नेते आहेत, त्यांचे आमच्या मनात मोठे स्थान आहे त्यामुळे आम्ही त्यांचा फोटो वापरत आहोत आणि यापुढेही वापरत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शरद पवारांचा सर्वात मोठा फोटो माझ्या ऑफिसमध्ये आहे तो मी कधीही काढणार नाही असेही त्यांनी सांगितले.

बीडमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवार गटाकडून फ्लेक्सबाजी – बीड येथील धनंजय मुंडे यांच्या मतदार संघामध्ये आज शरद पवारांची सभा होत आहे. या सभेमध्ये शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अजित पवार गटाकडून येथे शरद पवारांच्या फोटोसह फ्लेक्स लावण्यात आले असून साहेब, सर्वसामान्य जनतेच्या मनातील चेहऱ्याला आशीर्वाद द्या अश्या आशयाची फ्लेक्सबाजी येथे पहायला मिळत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago