धक्कादायक – दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा शॉक बसून पती, पत्नी, मुलाचा जागीच मृत्यू

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील दापोडी गावामध्ये विजेचा करंट बसून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. याबाबत बिभीषण निवृत्ती जाधव, (वय ६१ वर्षे, व्यवसाय हमाली, रा.सध्या दापोडी,मराठी शाळेपाठीमागे, ता. दौंड जि. पुणे) यांनी खबर दिली असून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

बिभीषण जाधव यांचे मेहुणे सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४५ वर्षे, सध्या रा. दापोडी ता दौंड,सुर्यकांत महादेव आडसुळ यांच्या खोलीमध्ये) त्यांची पत्नी आदिका सुरेंद्र भालेकर, (वय ३८ वर्षे) व मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १९ वर्षे) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. भालेकर कुटुंब हे दापोडी गावात राहण्यास होते. ते मोलमजुरी करून त्यांचे कुटुंबाची उपजिवीका करत होते. मिळालेल्या माहितीनुसार दि.१७/०६/२०२४ रोजी सकाळी ७ च्या सुमारास फिर्यादी यांचा मेव्हणा सुरेंद्र देविदास भालेकर हे अंघोळीसाठी टॉवेल काढायला गेले असता त्यांना वलनीच्या तारेचा शॉक लागला त्यावेळी त्यांना वाचवायला त्यांची पत्नी आदिका सुरेंद्र भालेकर गेल्या मात्र त्याही करंट बसल्याने तेथे चिकटल्या त्यानंतर त्यांचा १९ वर्षीय मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर हा त्यांना वाचवायला गेला मात्र तोही तेथे चिकटला. या तिघांना  वलनीच्या तारेचा शॉक लागुन ते अखेर खाली कोसळले आणि जागीच गतप्राण झाले अशी माहिती मिळत आहे.

लोकांना याची खबर लागताच त्यांनी विजपुरवठा बंद करून या तिघांजवळ जावुन पाहिले असता त्यावेळी त्या तिघांची शरीराची काही एक हालचाल होत नव्हती. त्या तिघांना विजेचा शॉक बसुन त्यातच ते अखेर मयत झाले. घडलेला प्रकार पोलीसांना समजताच  केडगाव पोलिस चौकीचे सपोनि सपांगे, बाळासो गाडेकर, विशाल जाधव, सोनवणे, कापरे, चोरमले, भोसले या पोलीसांनी त्वरीत सदर ठिकाणी येवुन मयत बॉडीचीपाहणी करून पोस्टमार्टेम करणेकामी अँब्युलन्स मधुन यवत ग्रामीण रूग्णालय येथे पाठवुन दिले आहेत. घडलेल्या घटनेने संपूर्ण दापोडी गावावर शोककळा पसरली आहे.