सुरत –
गुजरात राज्यातील सुरत शहराजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने 18 मजुरांना चिरडल्याची Horrible incident भीषण घटना घडली आहे. या अपघातामध्ये 14 मजूर ठार झाल्याची माहिती मिळत असून 4 जण गंभीर जखमी आहेत.
हि घटना सूरतच्या पिपलोद गावाजवळ घडली असून अपघातानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघाताची घनटेची माहिती मिळताच जवळील पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार ऊस वाहतूक करणारा ट्रक हा रस्त्यावरून बेदरकारपणे पुढे जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकवरील त्याचे नियंत्रणात न राहिल्याने स्त्याच्या कडेला झोपलेल्या मजूरांच्या अंगावर जाऊन हा भीषण अपघात घडला.
या हृदयद्रावक घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व लोक हे मजूरीची कामे करून आपली गुजराण करत असल्याचे समोर येत असून हे सर्वजण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.