जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श शिक्षिका म्हणून अनुराधा जगताप (काळे) यांचा सन्मान

नितीन काळे

खडकी : दौंड तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका अनुराधा संतोष जगताप (काळे) यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड मॅडम , शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

जगताप मॅडम यांचे दौंड पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी महाजन, दौंड बीट चे विस्तार अधिकारी आदरणीय दिघे, गोपाळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख होले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितिच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.