Categories: Previos News

मा.नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या नातलगांना जीवे मारण्याचा प्रयत्न ! आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दौंडमध्ये निघाला मूक मोर्चा

अख्तर काझी

दौंड : शहरातील कुंभार गल्ली परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी हाणामारी झाली. या प्रकरणामध्ये दौंड पोलिसांनी मा. नगराध्यक्ष बादशहा शेख यांसह त्यांच्या नातेवाईकांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना अटक व्हावी म्हणून आमदार नितेश राणे यांनी दौंडमध्ये येऊन हिंदू जन आक्रोश आंदोलन केले, प्रकरण इतके चिघळले की तत्कालीन पोलीस निरीक्षक यांची बदली करण्यात आली.

कालांतराने बादशाह शेख व इतर आरोपींना अटक झाली. याच हाणामारी प्रकरणात बादशाह शेख यांच्या नातलगांना मारहाण व विनयभंग करणाऱ्या आरोपींविरोधातही गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी बादशाह शेख समर्थकांनी सुद्धा दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. म्हणून बादशाह शेख यांच्या नातलकांनी या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागितली. न्यायालयाने बादशहा शेख यांच्या नातलगांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व विनयभंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दौंड पोलिसांनी विनयभंग करणे व जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये अक्षय घोलप, कुणाल घोलप ,बाबू जमदाडे ,अजय घोणे, महेश घोणे ,गोरख घोलप, सागर मादेकर ,श्रीनाथ ननवरे ,दीपक कांबळे ,कोमल जमदाडे व दहा अनोळखी अशा वीस जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे बादशहा शेख समर्थकांनी या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरातून मूक मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली व दौंड पोलीस स्टेशन समोर मोर्चाची सांगता करण्यात आली. मा. आमदार रमेश थोरात,वैशाली नागवडे, हाजी सोहेल खान, आप्पासो पवार, वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, आबा वाघमारे, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व महिला बहुसंख्येने मोर्चामध्ये सामील होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये बोलताना सर्वच पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या व पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.व गुन्हेगार कोणत्याही गटाचा असो त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये अशी मागणी केली.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago