Categories: Previos News

पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत

दौंड (खुटबाव) : कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याने राज्यभरातील सर्व महाविद्यालये दीर्घ काळानंतर आजपासून ऑफलाईन सुरू झाली. आज पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयामध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींचे स्वागत भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सहसचिव सूर्यकांतकाका खैरे आणि संचालक अरुण थोरात ह्यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक – शिक्षकेतरांनी मोठ्या उत्साहात केले.

पहिला दिवस असल्याने वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती हि तुरळक होती. त्यामध्ये एफ.वाय.बी.ए. – ११ , एस.वाय.बी.ए. – ७ , एफ.वाय.बी.कॉम. – १५ , एस.वाय.बी.कॉम. – ७ , एफ.वाय.बी.एस्सी. – २ , एस.वाय.बी.एस्सी. – १५ आणि टी.वाय.बी.एस्सी. – २. हे सर्व विद्यार्थी वर्गात एका बेंचवर एक ह्या पद्धतीने बसतील आणि तोंडाला मास्क लावतील ह्याची काळजी महाविद्यालयातर्फे घेण्यात आली होती. महाविद्यालयात लस न घेतलेल्यांना लवकरच लस घेण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी सांगितले.

कोरोनाविषयक नियमावलींचे पालन करीत पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहण्याबाबत उपाययोजना महाविद्यालय राबविणार आहे. असे प्राचार्य डॉ.सांगोलेकर यांनी सांगितले. दीर्घ काळानंतर महाविद्यालयात आज प्रथमच विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती लाभल्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago