Categories: Previos News

Help For Covid ceter : गुजराती भवन कोविड सेंटरला दौंड मधील दानशूरांनी दिला मदतीचा हात, उद्योजक राजेंद्र उगले यांच्या तर्फे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस कल्याण निधीला 1 लाख 25 हजार रुपयांची मदत



| सहकारनामा |

दौंड : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनावरील ताण कमी व्हावा या  उद्देशाने दौंड मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या गुजराती भवन  कोविड सेंटर ला आज दौंड अर्बन बँकेचे चेअरमन प्रेमसुख कटारिया, गोविंद अग्रवाल, बाबा शेख, ॲड. अजित बलदोटा,नगरसेवक शहानवाज पठाण व अर्बन बँकेचे व्यवस्थापक कुलकर्णी आदींनी भेट देत रुग्णांना उत्तम सेवा देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या गुजराती  कोविड सेंटरच्या सेवेमध्ये आपला सुद्धा हातभार लागावा म्हणून आर्थिक मदतही देवू केली. 

विशेष म्हणजे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या सोनवणे ताई यांनी   कोरोना वर मात करीत बरे होऊन घरी परतताना सेंटरला एक हजार रुपयांची भेट देऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. 

येथील उद्योजक राजेंद्र उगले यांनी आपले वडील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वि.रा. उगले(काका) यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुजराती भवन कोविड सेंटरला 25 हजार रु., पंतप्रधान कल्याण निधीला  1 लाख, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस कल्याण निधी ला 1 लाख 25 हजार रू तसेच सिंधी मंगल कार्यालय येथील कोविंड सेंटरला 25 हजार रुपयांची मदत केली आहे. 

शहरातील सर्वच  कोविड सेंटरला येथील दानशूर व्यक्ती मोठी मदत करीत असल्याने दौंडकरांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

9 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

22 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

24 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago