पुणे : सहकारनामा ऑनलाइन
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये शिंदवणे येथे ढग फुटी होऊन मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली. या धगफुटीची झळ शिंदवणे घाटाच्या खाली असणाऱ्या उरुळी कांचनला बसली असून उरुळी कांचनमध्ये असणाऱ्या ओढ्यांना पूर आल्याने त्याचे पाणी थेट मंडई आणि दुकानांमध्ये घुसले आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर शिंदवणे येथे ढगफुटी होऊन मोठा पाऊस झाला.यानंतर येथील ओढ्यांना पूर येऊन सर्व परिसर जलमय होऊन उरूळी कांचन येथील मंडई पाण्याखाली गेली. या भागातील रस्त्यांवरून पाण्याचे मोठे लोंढे वाहत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यातील आबेक गावांमध्ये धगफुटीमुळे अशीच काहीशी परिस्थिती बनली आहे. ओढ्याला आलेल्या अचानक पुरामुळे उरुळीकांचन येथील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या तेथील बाजारतळ हा पाण्याखालीच असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.