Categories: आरोग्य

‛डाळिंब’ फळाचे हे आहेत ‛आरोग्यवर्धक’ फायदे, जाणून ‛आश्चर्यचकित’ व्हाल

आरोग्य विशेष :
राज्यातील अनेक भागांमध्ये आपण डाळिंबाच्या बागा पाहतो. डाळिंब दिसायला आणि खायला जितके चविष्ट असते तितकेच त्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
तसे पाहिले तर डाळिंब या फळाला अनेक ठिकाणी औषधी फळ म्हणूनही संबोधले जाते. महाराष्ट्राचा डाळिंब उत्पादनात मोठा वाटा आहे. देशातील विविध राज्यांमध्येही डाळिंबाचे क्षेत्र विस्तारत आहे. डाळिंब हे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी आणि अतिशय पौष्टीक असे फळ असून त्यामध्ये पाण्यासह रायबोफ्लेविन, लोह, कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ आढळतात. डाळिंब हे फळ आणि त्याचा रस हृदयरोग, अतिसार, कंठरोग, मुखरोग यांचा नाश करते. नुसते डाळिंबच नव्हे तर त्याची सालही अनेक विकारांत उपयुक्त ठरते, तिचा वापर उपदंश, अतिसार, खोकला, संग्रहणी, रक्ती अतिसार या विकारांमध्ये केला जातो. ज्या व्यक्तींना ताप असतो त्यांना डाळिंबाचा रस दिला जातो जेणेकरून तापातील तहान त्यामुळे भागते आणि ताप कमी होण्यासाठी त्याचा वापर होतो. ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत त्यांना हृदयरोगात शक्ती प्रदान करण्यासाठी डाळिंबाच्या रसाचा चांगला फायदा होतो. हृदय  रोग, पोटातील आग, घशातील, मुखातील रोग यावर डाळिंबाचा रस गुणकारी ठरतो. त्याच्या सेवनाने शरीराला चांगली पोषक द्रव्य मिळतात. रक्त वाढविण्यासाठी, उत्साह निर्माण करण्यासाठी आवर्जून डाळिंबाचा रस घेतला जातो.

‛हे आहेत डाळिंबाचे फायदे’

महाराष्ट्र राज्यात डाळिंबाचे सर्वात जास्त उत्पादन होते. त्यामुळे बाजारात ते सहज उपलब्ध असते मात्र अनेकांना त्याचे फायदे माहीत नसल्याने त्यांचा डाळिंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फक्त एक फळ म्हणून असतो मात्र डाळिंब फळाचे पुढील फायदे वाचून तुम्हीही त्यास नुसते फळ नाही तर आरोग्यदायी फळ म्हणून संबोधताल..

डाळिंबामध्ये पोटॅशियम भरपूर असते त्यामुळे त्याचा रस घेतल्याने किंवा ते सेवन केल्याने आपले हृदय हे कार्यक्षम अन निरोगी राहते. डाळिंब रस घेतल्याने तो हृदयरोग नाशक ठरतो.
खडीसाखर अनो डाळिंबाच्या रसाचे एकत्र सेवन केल्यास पोटातील जळजळ, आंबट ढेकर आणि लघवीची आग कमी होते.
शरीरातील ताप जास्त असल्यास घशातील कोरड, लघवीचा त्रास आणि जळजळ कमी करण्यासाठी डाळींबाच्या रसाचा चांगला उपयोग होतो.
शरीरात उष्णतेचे विकार वाढत असल्यास त्यावर डाळिंब रसाचा मोठा फायदा होतो.
डाळिंब रसातील ग्लुकोज व फ्रुक्टोजच्या साखरेमुळे शरीर ताजेतवाने वाटते.
या फळातील रस यकृत, हृदय व मेंदूचे आजार कमी करून कार्यक्षमता वाढवते.
डोळे आल्यास रसाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यास जळजळ थांबते.
रक्तपिती रोगावर डाळिंब रस गुणकारी आहे.
याचा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना चांगला फायदा होतो.
डाळिंबाचा रस सप्तधातु वर्धक आणि बलदायी आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago