Categories: क्राईम

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून 8 वर्षे महिलेवर अत्याचार करत 35 लाख रुपये लुटले, तोतया पोलीस अधिकाऱ्यासह संपूर्ण कुटुंबच होते प्रकरणात सामिल

यवत (दौंड) : एका इसमाने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून एका महिलेवर तब्बल आठ वर्षे बलात्कार केला. अत्याचाराचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 35 लाख रुपये लुटले. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात त्या तोतया पोलिसाच्या कुटुंबियांनीही मदत केल्याने त्या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

@sahkarnama

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी 1) मनीष बिलोण ठाकुर,
2) सौ.हन्ना मनीष ठाकुर 3) संदेष मनीष ठाकुर 4) श्वेता मनिष ठाकुर (सर्व रा.रा.डिफेन्स कॉलणी,निरंजन बिल्डींग दौंड जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट 2015 ते मार्च 2023 पर्यंत मनिष बिलोण ठाकुर याने मी पोलिस आहे असे पीडित फिर्यादी महिलेला सांगून तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व याबाबत कोणाला सांगितले तर कुटुंबातील लोकांना ठार मारेल अशी धमकी दिली.

तसेच मनिश ठाकुर, त्याची पत्नी सौ.हन्ना मनीश ठाकुर, मुलगा संदेष मनीश ठाकुर,मुलगी ष्वेता मनिश ठाकुर यांनी संगनमताने पीडित महिलेला अश्लील व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन सन 2015 ते सन 2023 दरम्यान वेळोवेळी 35 लाख रूपये रोख स्वरूपात घेतले. सदर गुन्ह्यातील आरोपी मनीष ठाकुर हा स्वत मोठा पोलीस अधीकारी आहे असे पिडीत महिलेला सांगत होता. तसेच मोठमोठे पोलीस अधीकारी माझे मित्र आहेत, तु पोलीस स्टेशनला गेली तरी मला काही फरक पडणार नाही असे म्हणुन तो त्या महिलेला धमकावत असल्याने पीडित महिलेने घाबरुन बरेच दिवस तक्रार दिली नव्हती.

यवत परिसर व दौंड परिसरामध्ये वरील आरोपींनी जर अशा बाबतीत धमकी देऊन कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी यवत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago