अख्तर काझी
दौंड : दौंड मधील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत बुर्हानुद्दीन औलिया यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ऐतिहासिक शाही आलमगीर मशीद व मशिदीचे मुख्य विश्वस्त इनामदार परिवाराच्या वतीने दरवर्षी बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
येथील सर्व हिंदू, मुस्लिम बांधव मोठ्या भक्ती भावाने यामध्ये सहभागी होत असतात.दि.30 जानेवारी (उरूस )रोजी सायंकाळच्या नमाज पठणानंतर बाबांच्या दर्ग्यामध्ये सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. बाबांच्या मजारवर फुलांची सादर अर्पण करीत सर्वांसाठी दुवा करण्यात आली.
मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, गावचे पाटील मा. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, गोविंद अग्रवाल, मा. नगरसेवक शहनवाज पठाण, ऍड. अमोल काळे, शरफुद्दीन बागवान आदी यावेळी उपस्थित होते. उरूस निमित्ताने युसुफ इनामदार कुटुंबीयांच्या वतीने सर्व भक्तांसाठी अन्नदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविकांनी याचा लाभ घेतला. युसुफ इनामदार, गालिब इनामदार, अनिस इनामदार, अरबाज इनामदार ,इमरान नालबंद, शाकीर बागवान, रेहान बागवान, जहा सय्यद, मुजाहिद सय्यद आदींनी आयोजन केले.