दौंड : केडगाव येथील हरिष सुनील अवचट यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी पीएचडी पदवी मिळविल्याने केडगाव पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
श्री. जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाला युनिव्हर्सिटी, राजस्थान या विद्यापीठातून हरिष अवचट यांना इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांना या संशोधनासाठी डॉ.भारत गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. सद्य स्थितीत परिक्रमा शैक्षणिक संकुल, काष्टी या ठिकाणी ते प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.
हरिष अवचट यांचे शिक्षण एम.ई.पॉवर सिस्टम व बी.ई. इलेक्ट्रिकल झाले असून त्यांचे 5वी ते 12वी महाविद्यालयीन शिक्षण भैरवनाथ विद्यालय खुटबाव (ता. दौंड) येथे झाले आहे.
पीएचडी PHD म्हणजे काय..? इंग्लिशमध्ये ज्याला पीएचडी म्हणतात त्याला मराठीमध्ये पी.एच.डी. म्हणजे ‘तत्वज्ञानातील डॉक्टरेट’ किंवा “तत्वज्ञानाचे डॉक्टर.” असे म्हटले जाते. पी.एच.डी. तुमची कौशल्ये वाढवण्याचा आणि तुमचे करिअर आणखी आकर्षक बनवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. थोडक्यात एखाद्या विषयातील संपूर्ण ज्ञान आत्मसात करण्याला पीएचडी केली असे म्हटले जाते.