Categories: धार्मिक

केडगावच्या अवचट मळा येथे ‘अखंड हरिनाम सप्ताहास’ प्रारंभ

केडगाव : केडगाव येथील अवचट मळा येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहला सुरुवात झाली आहे. अवचट मळा येथे हरीनाम सप्ताह आयोजित करण्याचे हे १९ वे वर्ष आहे.

यावर्षी हरीनाम सप्ताहला ‘श्रीमद् भागवत कथेचे निरूपण’ सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये ह.भ.प. सुरेश महाराज साठे, अध्यक्ष संतराज महाराज संस्थान यांच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती सोमनाथ मंदिर ट्रस्ट यांच्याद्वारे देण्यात आली. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री दहा ते बारा यावेळी ह.भ.प. संतोष महाराज भागवत यांचे हरिकीर्तन होईल, दिनांक ०९ रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये ह.भ.प. सुरेश महाराज साठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

केडगावच्या अवचट मळा येथे गेल्या १९ वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन करण्यात येते. पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी भेट देत असतात. याही वर्षी सर्व ग्रामस्थांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या सभासदांनी केले आहे.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago