पुणे/दौंड : न्यायालयात गोरगरीब आणि अन्याय पिडीत लोकांची बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या ‛सरकारी महिला वकिलांना’ काल दौंड शहरात खूपच धक्कादायक अनुभव आला आहे. खाजगी दवाखाने आणि डॉक्टर यांच्या आरोग्य यंत्रणेच्या तातडीच्या सेवेबद्दल आता प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
झाले असे की, दौंड न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या महिला वकिलांच्या 4 वर्षाच्या मुलीला 29 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक ताप आला. त्यांनी आपल्या मुलीला ताप मोजणारे यंत्र (थर्मामिटर) लावून चेक केले त्यावेळी त्यांच्या मुलीचा ताप हा 105 च्या पुढे दाखवत होता.
या चिमुरडीला रात्री अचानक इतका ताप आल्याने या महिला वकील मातेने आपल्या पतींसह आपल्या चिमुकलीला घेऊन एक लहान मुलांवर उपचार करणारे हॉस्पिटल गाठले आणि येथूनच त्यांची फरफट सुरु झाली.
महिला वकील या दवाखान्यात जाताच आत रात्रीसाठी फक्त देखरेखीवर असणारे काही कर्मचारी होते. त्यांना डॉक्टर आहेत का? असे विचारले असता त्यांनी नेहमी प्रमाणे डॉक्टर साहेब पुण्याला गेले आहेत, उद्या सकाळी येतील, तुम्ही सकाळी या असे उत्तर मिळाले. यानंतर त्यांनी डॉक्टरांचे असिस्टंट असतील तरी बोलवा मुलीला खूप ताप आहे अशी विनवणी केली परंतु पेशंट पाहायला असिस्टंट किंवा कुणीच नाही असेच उत्तर समोरून आले. त्यानंतर त्यांनी दौंड शहरातील लहान मुलांच्या अनेक दवाखाण्यांत आपल्या मुलीला घेऊन गेले, मात्र प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर येत होते. डॉक्टर पुण्याला गेले आहेत, सकाळी या.
या सेम उत्तरांनी महिला वकिलांच्या डोळ्यात पाणी येत होते आणि हातात तापाने फनफनत असलेली चिमुकली होती. हे सर्व पाहून त्यांच्या पतीराजांनाही आपले अश्रू रोखता येत नव्हते.
या गंभीर प्रकाराबाबत महिला वकिलांनी ‛सहकारनामा’ ला माहिती देताना, आम्ही रात्रीच्या 11 वाजले पासून माझ्या मुलीला खूप ताप असल्याने दौंड मधील प्रत्येक लहान मुलांच्या हॉस्पिटल मध्ये फिरलो परंतु प्रत्येक हॉस्पिटलला एकच उत्तर मिळाले की डॉक्टर पुण्याला गेलेत, सकाळी या.. अशा तातडीच्या वेळी जर आमच्या सारख्या सरकारी माणसाला उपचार मिळत नसतील तर सामान्य जनतेचे कसे होत असेल, त्यांना काय वागणूक मिळत असेल याची कल्पनाही करवत नाही अशी प्रतिक्रिया या महिला वकिलांनी दिली.
माणूस सांगून कधीच आजारी पडत नाही, त्यामुळे कधी, कुणाला तातडीची मदत लागली आणि हॉस्पिटल ने जर वरील उत्तरे दिली तर हि मोठमोठी हॉस्पिटल काय कामाची??? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी, एकही हॉस्पिटलला असिस्टंट डॉक्टर नाही
याला जबाबदार कोण आहे..?? आम्ही आमच्या बाळाला रात्री 1:30 वाजता बारामतीला घेऊन चाललो होतो पण एक ओळखीचे डॉक्टरांचा फोन झाला आणि त्यांनी एक औषध सांगितले. ते औषध दिल्यानंतर साधारण 2 तासांनी ताप कमी झाला अण आमच्या जिवात जीव आला..,
पण जर आपल्या गोर गरीब लोकांवर अशी वेळ आली तर त्यांनी ऐन रात्री कुठे जायचे, डॉक्टरच जर पेशंट तपासायला खाली येत नसतील तर कुणाची मदत मागायची आणि जर त्या पेशंटचे उपचाराविना काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण?? असा प्रश्नही त्यांनी शेवटी उपस्थित केला आहे.