स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवानिमित्त’ केडगावमध्ये अनोखा उपक्रम

दौंड :

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे औचित्य साधून आपल्या मनातील ठासून भरलेले देशप्रेम व तिरंग्यावरील निष्ठा व्यक्त करताना केडगावमधील साहेबराव गायकवाड यांनी आपल्या घरासमोरील अंगणात माजी सैनिक सोमनाथ टाके यांच्या हस्ते ध्वजारोहन केले. हा उपक्रम दि.14 ऑगस्ट 2022 रोजी पार पडला.

साहेबराव गायकवाड यांच्या घरासमोर यावेळी सुंदर सजावट करण्यात येऊन रांगोळी काढण्यात आली होती. या उपक्रमावेळी देशभक्ती गीते लावण्यात आली होती. तसेच झेंडापोल रोवून गावातील नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते. या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये तिरंग्यास सलामी देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी केडगावचे सरपंच अजित शेलार यांसह गावातील प्रतिष्ठित व जेष्ठ नागरीक तसेच जवाहरलाल विद्यालयाचे (सेवानिवृत) शिक्षक, शिक्षकेतर उपस्थित होते.

या कार्यक्रमात विजय रोकडे, किरण देशमुख
नितीन जगताप, ज्ञानदेव जगताप, पी एस आय नवनाथ धायगुडे आणि अनिश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निजाम शेख सर व आभार समीर गायकवाड यांनी मानले.