Categories: Previos News

Hadapsar – कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा चौरे यांचे आवाहन



| सहकारनामा |

पुणे -हडपसर (प्रतिनिधी)

महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यात कोरोना प्रसार वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, केंद्र व राज्य सरकारने लस उपलब्ध करून लसीकरण मोहीम प्रभावी राबविल्यास कोरोनावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सुरेखा चौरे यांनी केले.

जिल्हापरिषद सदस्या व समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे यांच्या माध्यमातून व वडकी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वडकी, पिंपळमळा येथे काल ४५ वर्षावरील सुमारे ३०० नागरीकांना लस देण्यात आली. वडकी गावामध्ये २ एप्रिल पासून लसीकरण चालू ठेवले आहे. सुमारे १६०० नागरीकांनी लसीचा लाभ घेतला आहे. 

वडकी ग्रामस्थांच्या वतीने सुरेखा चौरे आणि लसीकरणसाठी आपले स्वत:चे गोडाऊन उपलब्ध करून देणारे राजूदादा पवार यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी सरपंच अरूण गायकवाड, उपसरपंच शितल मोडक, सचिन मोडक, संदिप धाडसी मोडक, अमोल मोडक, पै. दिलीप मोडक, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ मोडक, सागर मोडक, कावेरी मोडक, वैयजंता मोडक, स्नेहा मोडक, तुकाराम आबा मोडक, ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ, रविशेठ पवार, सुनिल पवार अविनाश मोडक, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे संचालक सगाजी केरबा मोडक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल हिरामण मोडक व रविशेठ पवार यांनी केले होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago