Categories: Previos News

काय सांगता..! व्यसन आणि मैत्रिणींना गिफ्ट देण्याकरिता वैद्यकीय शाखेच्या दोन विद्यार्थ्यांनी केली पुण्यातील प्रसिध्द ज्वेलर्सच्या दुकानांतून सोन्याची चोरी.. हडपसर पोलीसांकडून दोन्ही आरोपी अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

हडपसर : ऐश, मौजमजा आणि मैत्रिणींना गिफ्ट देण्याकरिता वैद्यकीय शाखेच्या दोन विद्यार्थ्यांनी पुण्यातील दोन प्रसिध्द ज्वेलर्सच्या दुकानांतून सोन्याची चोरी केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. हडपसर पोलीसांकडून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०८/१२/२०२१ रोजी दुपारी ०२.४५ ते ०२.५५ वा.चे दरम्यान रांका ज्वेलर्स, हडपसर पुणे येथे मास्क लावून आलेल्या दोन अनोळखी तरूणांनी दुकानातील अंगठ्या दाखवण्यास सांगून दाखवलेल्या अंगठ्यापैकी ३ अंगठ्या निवडून त्यातील एक तरुण दुकानातुन बाहेर निघून गेला. त्यानंतर दुकानातील कामगार पाठीमागे वळून सोन्याचा ट्रे ठेवत असताना, दुकानात असलेला दुस-या तरूणाने तेथील सोन्याच्या ३ अंगठ्या घेवून दुकानाचे बाहेर पळत सुटला. यावेळी आधिच दुकानातून बाहेर गेलेला तरुण मोटारसायकल घेऊन आला आणि दोघेजण सोन्याच्या तीन अंगठ्या घेऊन भरधाव वेगाने निघून गेले.
त्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १०७७/२०२१ भा.दं.वि.क ३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाची हडपसर पोलीसांनी तपास सुरू केला असता, असे निष्पन्न झाले की, त्याच दिवशी हडपसर येथील घटनेच्या पुर्वी याच तरूणांनी ब्ल्यु स्टोन ज्वेलर्स कोथरूड, पुणे या दुकानातुनही अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात जावून अशाच प्रकारे सोन्याच्या अंगठ्या दाखवीण्यास सांगून अंगठी चोरून घेवून पळून गेले होते. या घटनेचा गुन्हा अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं १९८/२०२१ भा.दं.वि.कलम ३८०,३४ प्रमाणे दाखल होता.

हडपसर पोलीस तपास पथकाकडून करण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे पोलीस अंमलदार शाहीद शेख, निखील पवार व प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या बातमीद्वारे हडपसर पोलीसांनी आरोपी अनिकेत हनुमंत रोकडे (वय २३ वर्ष रा. राधाकुंज निवास, महात्मा गांधी कॉलेज जवळ,नागोबानगर, अहमदपुर लातुर) व आरोपी वैभव संजय जगताप (वय २२ वर्ष रा. मु.पो.कैवाड केनवड ता.रिसोड जिल्हा वाशिम) यांना ताब्यात घेत या दोन्ही तरूणांकडे तपास केला असता, दोन्ही आरोपी हे पुण्यातील दोन जुन्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात बी.ए.एम.एस व बी.एस.सी नर्सिंग चे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असून ते व्यसनाधिन असल्याचे समोर आले. त्यांनी व्यसन, चैनी करीता तसेच मैत्रीणीला गिफ्ट देण्यसाठी वरिल चो-या केल्या असल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या ३६ ग्रॅम ७७० मिली ग्रॅम वजनाच्या एकूण ४ सोन्याच्या अंगठ्या तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण किं.रू २,५०,०००/- चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोनि.(गुन्हे) श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार, प्रदीप सोनवणे, गणेश क्षिरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुंभार यांचे पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

16 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago