‛कोटींची’ किंमत असलेला ‛गुटखा’ थेऊर फाट्यावर पकडला, गुन्हेशाखा युनिट 6 कडून ट्रक आणि ट्रक चालक ताब्यात

पुणे : गुन्हे शाखा, युनिट-६, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार युनिट-६ चे हद्दीमध्ये गस्त करित असताना त्यांना लोणी काळभोर हद्दीमधून सोलापूर रोडने एक आयशर ट्रक मोठया प्रमाणामध्ये अवैध गुटखा घेवून जाणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती. याबाबत गणेश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-६, पुणे
शहर यांना माहिती दिली असता त्यांनी कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने युनिट-६ कडील स्टाफ यांनी सापळा रचून थेऊर फाटा चौक, पूणे-सोलापूर रोड,पुणे येथे आयशर ट्रक क्र.एमएच/११/सीएच/६०६८ हा ताब्यात घेतला. ट्रक चालक प्रविण दुर्योधन जाधव,(वय २६ वर्षे,रा.मु.पो. गुरसाळे, ता.खटाव,जि.सातारा) याच्याकडे तपास करता त्याने ट्रकमध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ गुटखा असल्याचे सांगितले.

त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणेकामी अन्न व औषध प्रशासन, औंध, पुणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडील अन्न सुरक्षा आधिकारी श्री.कोकणे हे हजर झाल्याने त्यांचेसमक्ष आयशर ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये गुटख्याच्या एकूण १५० गोण्या मिळून आल्या. त्यामध्ये ५६,४८,८२०/- रु किंमतीचा ४००० किलो विमल गुटखा व वाहतूकीकरिता वापरलेला
२४,५०,०००/- रु किंमतीचा आयशर ट्रक असा एकूण ८०,९८,८२०/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा माल बाजारामध्ये दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे निदर्शसनास आले असून बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत करोडोमध्ये जात आहे.

अन्न सुरक्षा आधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर नमूद ट्रक चालकावर लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र ३०/२०२२ भादवि कलम १८८, २७२, २७३, ३२८, ३४, व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३०(२)(अ), २६(२)(I), २६(२)(IV), अन्न सुरक्षा मानके कायदा प्रोव्हिबिशन अॅण्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ तसेच सहवाचन ३(1)ZZ चे उल्लंघन केल्याने नियम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे,श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-२, श्री.लक्ष्मण बोराटे यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,श्री.गणेश माने, सहा.पोलीस निरीक्षक,नरेंद्र पाटील, पो.उप.नि.सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास
तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.