केडगाव, दौंड : श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी (वाखारी) आणि सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय (केडगाव) येथे गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दोन्ही महाविद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभाव आणि आनंदात साजरा करण्यात आला. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करत विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
श्री धनाजी शेळके फार्मसी कॉलेजमध्ये कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुवंदना, भक्तिगीते, आणि भाषणांद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.तसेच मुलांची गुरु वर आधारित प्रश्नामंजुषा कार्यक्रमाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि प्रेरणादायी झाले होते. कार्यक्रम प्रसंगी धनशोभा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष धनाजी शेळके, सचिव सौ. राधिका शेळके, खजिनदार परीक्षित शेळके, उपाध्यक्ष सत्यजित सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. संतोष वाघमारे आणि विभाग प्रमुख प्रा.विकास गडधे हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून गुरूंच्या जीवनातील भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना आपल्या शिक्षकांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी आम्हाला घडविले. याबाबत विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला. महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. नानासाहेब जावळे यांनी मनोगत व्यक्त करताना गुरूची महती विशद केली. तर मराठी विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब गव्हाणे यांनी गुरु परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. आय क्यू ए सी प्रमुख डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी विद्यार्थी सतीश हंडाळ, रवींद्र येळे, अमोल भांडवलकर, गणेश महाडिक, अमोल मेमाणे या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार करून आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. अशोक दिवेकर, डॉ. अनुराधा गुजर, डॉ. ज्ञानेश्वर राऊत, डॉ. मनीषा जाधव, डॉ. तनवीर शेख, प्रा.अरविंद मिंधे, प्रा.ओंकार अवचट व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुरेखा देशमुख यांनी केले तर आभार डॉ. शोभा वाईकर यांनी मानले.