मुंबई : सुपरस्टार सलमान खान, बॉलिवूडचा दबंग अभिनेता म्हणून ओळख असलेल्या अभिनेता आहे मात्र याच अभिनेत्याच्या घराबाहेर रविवारी 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता गोळीबार झाला आहे. अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी अनेक राऊंड फायर केले असल्याचे समजत आहे. मुंबई पोलिसांनी या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञात लोकांनी हवेत तीन ते चार राऊंड फायर केले. गोळीबार करणारे दोनजन बाईकवर आले होते आणि नंतर त्यांनी सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करून तेथून पळ काढला. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.
गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. गोळीबाराच्या या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान च्या घराबाहेरची सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
सलमान खानला धोका कोणाचा ?
तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 2023 मध्ये एका कथित टीव्ही मुलाखतीत लॉरेन्स म्हणाला होता की, सलमानने बिश्नोई समाजाचा अपमान केला आहे आणि त्यामुळे त्याला त्याच्याकडून सूड घ्यायचा आहे. तो म्हणाला की, सलमानला मारणे हाच त्याच्या आयुष्याचा उद्देश आहे. लहानपणापासूनच त्याच्या मनात सलमानबद्दलचा राग आहे. 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानच्या नावाचा समावेश होता. त्या कारणास्तव लॉरेन्सला त्याला मारायचे आहे.
18 मार्च 2023 रोजी सलमानच्या एका साथीदाराला धमकीचा ई-मेल आला होता. गोल्डी ब्रारला सलमानशी बोलून हे प्रकरण बंद करायचे आहे, असे लिहिले. फक्त वेळेत माहिती दिली. पुढच्या वेळी धक्का बसेल. या मेलनंतर पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
2022 मध्ये सलमानचे वडील सलीम खान यांनाही धमकीचे पत्र आले होते. यामध्ये सलमान आणि सलीम खान यांची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल, असे म्हटले होते. या बातमीनंतर लॉरेन्सने सलमानला मारण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्याने चार लाखांची बंदूक खरेदी केली होती. पण ती योजना यशस्वी होऊ शकली नाही अशी माहिती आता समोर येत आहे.