Categories: Previos News

धक्कादायक : गुजरातमधील (gujrat covid center fire) कोविड सेंटरला आग, 12 रुग्णांचा मृत्यू

|सहकारनामा|

अहमदाबाद : गुजरात च्या भरुच येथे असणाऱ्या  कोव्हिड सेंटरला (gujrat covid center fire) भीषण आग लागून यात  12 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ANI या वृत्तसंस्थेकडून  मिळालेल्या माहितीनुसार पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री साधारण 12.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू होते.

प्राप्त माहितीनुसार गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी कोविड सेंटर आहे या कोव्हिड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाले आणि त्यातून आग लागली असावी असे अशी माहिती पुढे येत आहे.

कोविड सेंटरला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनेस्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण आयसीयू वार्ड आपल्या कवेत घेतला होता त्यामुळे येथील संपूर्ण आयसीयू वार्ड यात जाळून खाक झालं असल्याची माहितीही पुढे आली आहे.  

या आगीत जे  जखमी झाले होते त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

17 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

19 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

21 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago