Categories: देश

BREAKING NEWS : गुजरात| नदीच्या पुलावर 500 पेक्षा जास्त लोक असताना अचानक पूल तुटला | आत्तापर्यंत 30 लोकांचे मृतदेह बाहेर काढले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गुजरात : गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मच्छू नदीत बांधलेला केबल-ब्रिज (झूलता पूल) अचानक तुटल्याने 500 पेक्षा जास्त लोक नदीत पडले असून 30 मृतदेह आत्तापर्यंत नदीतून बाहेर काढण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत एका अधिकृत हिंदी टीव्ही न्यूज चॅनेलने सुद्धा या दुर्घटनेत आत्तापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. लोकांना नदीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. नूतनीकरणानंतर हा पूल नुकताच कार्यान्वित करण्यात आला होता.

पूल कोसळल्याने 500 पेक्षा जास्त लोक नदीत पडले आहेत. या अपघाताच्या वेळी पुलावर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते जे पूल तुटल्यानंतर नदीत फेकले गेले. लोकांना वाचविण्यासाठी पोलीस आणि प्रशासनासोबतच स्थानिक लोकही बचावकार्यात सहभागी आहेत. हा केबल पूल जुना असून केवळ 5 दिवसांपूर्वीच नूतनीकरणानंतर तो कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढ्या मोठ्या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या सात महिन्यांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. नूतनीकरणाचे काम एका कंपनीने केले होते. एवढ्या कालावधीनंतर पूल सुरू झाल्यामुळे रविवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कुटुंबीयांसह फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी पुलावर पोहोचले होते. त्यानंतर अचानक पूल तुटल्याने 500 पेक्षा जास्त लोक नदीच्या पाण्यात फेकले गेले. आत्तापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago