गुजरात पूल दुर्घटना|मृतांचा आकडा 140 च्या पुढे! ‘ते’ जुने व्हिडीओ दाखवून भ्रम नको तर जबाबदारी स्वीकारा.. विरोधक आक्रमक

गुजरात : गुजरात (gujrat) राज्यातील मोरबी (morbi) येथे असलेल्या मच्छू (machchu river) नदीवरील झूलता पूल (pool) तुटून झालेल्या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 140 पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढल्याने मच्छू नदी (machchu river) परीसरात आपल्या परिवारातील सदस्यांचा शोध घेते असलेल्या नातेवाईकांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळत आहे.

एकीकडे हा अपघात घडल्यानंतर बचावकार्य सुरु असताना दुरीकडे मात्र यावर राजकारनही होताना दिसत आहे. विविध मीडिया चॅनेलवर या झुलत्या पुलाचे व्हिडीओ प्रसारित करून लोक कसे त्यावर असणारी वायरुप ला हलवत होते, लाथा मारत होते, हे कोण लोक आहेत आणि त्यांचा उद्देश काय होता असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर मात्र राष्ट्रीय काँग्रेसने यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या फेसबुक पेजवर त्यांनी याबाबत तीव्र शब्दांत टिका करताना, जुने व्हिडीओ टाकून आता भ्रम का पसरवता असे म्हणून खालील प्रमाणे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

रात्रभर बचावकार्य करत असलेले जवान

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0AZcLLSgmBpazNsgumdXg7ZkkH22pBDPKfuV8kaDqueaV5Kn678SrRDWDVpfqom3Vl&id=100044325824967&sfnsn=wiwspmo

गुजरातमध्ये इतकी भयंकर घटना घडल्यानंतर आता त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून ज्या कंपनीने हे काम केले होते त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. स्थानिक प्रत्यक्षदार्शीनी दिलेल्या माहितीनुसार त्या पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली होती. तेथे इतकी गर्दी असूनही लोकांना त्या पुलावर का सोडले जात होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.