Categories: राजकीय

राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळेंकडून भाजप आ.राहुल कुल यांना शुभेच्छा

पुणे : भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुका आमदार राहुल कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. खा.सुप्रिया सुळे यांनी आ.राहुल कुल यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय पातळीवर जरी मतभेद असले तरी वयक्तिक पातळीवर मात्र पवार-कुल कुटुंबियांचे चांगले संबंध असल्याची चर्चा होत आहे.
पवार-कुल कुटुंबियांमध्ये सुभाष आण्णा कुल यांच्यापासून मोठे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते संबंध आ.राहुल कुल, मा.आ.रंजनाताई कुल यांनीही टिकवून ठेवले होते. मात्र 2009 साली राहुल कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळूनही त्यांना अंतर्गत गटबाजी होऊन धोका मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून 2014 साली विधानसभा निवडणुकीला रासप ची उमेदवारी घेत विजय मिळवला होता. त्यानंतर पवार-कुल परिवारामध्ये राजकीय वितुष्ट निर्माण झाले. या लोकसभेला दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजप ने बारामती मतदार संघातून खा.सुप्रिया सुळे यांच्याविरोधामध्ये उमेदवारी दिली होती. त्यानंतर आत्ता खा.सुप्रिया सुळे यांनी आ.राहुल कुल यांना शुभेच्छा दिल्याने पवार-कुल यांच्यात राजकीय मतभेद असले तरी वयक्तिकरित्या चांगले संबंध असल्याची चर्चा दौंड तालुक्यात सुरू आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago