Great work from plasma donor : दौंडमध्ये कोविड योध्या युवकांकडून “प्लाझ्मा दान”, सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव



| सहकारनामा | अब्बास शेख |

दौंड : कोरोना रुग्णांना ‛प्लाझ्मा’ दान करणे (Great work from plasma donor) म्हणजे त्या रुग्णाला प्लाझ्मा दात्याने रोगमुक्त करण्यासाठी केलेली अनमोल मदत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण ज्याच्यावर वेळ आली आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांनाच ‛प्लाझ्मा’ ची खरी किंमत कळते.

एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर कोरोना बाधितावर उपचार करणारे डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना या रुग्णास  ‛प्लाझ्मा’ लागेल असे हमखास सांगताना अनेकांनी ऐकले असेल मात्र हा ‛प्लाझ्मा’ म्हणजे नेमके काय? आणि तो कुठे मिळतो? असा प्रश्न त्यावेळी सर्वांनाच पडतो. मात्र हा ‛प्लाझ्मा’ कोणत्याही कंपनीत तयार होत नाही तर तो कोरोणातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तात काही महिने अँटीबॉडी म्हणून कार्यरत असतो  हे ज्यावेळी समजते त्यावेळी हा ‛प्लाझ्मा’ मिळविण्यासाठी मोठी धावपळ सुरू होते.

नेमकी हीच गरज ओळखून दौंड मधील कोरोनाला हरवून त्यातून मुक्त झालेल्या अनेक युवकांनी आपल्या शरीरातील ‛प्लाझ्मा’ हा नव्याने कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तींना देण्याचा स्तुत्य उपक्रम (Great work from plasma donor) राबवला आहे.

खऱ्या अर्थाने कोविड योद्धा ज्यांना म्हणावे अशा या दौंड च्या युवकांनी ‛प्लाझ्मा’ संकलन करणाऱ्या संस्थेस फोन करून आम्हाला ‛प्लाझ्मा’ दान करायचा आहे असे सांगितले आणि त्यांनाही थोडावेळ यावर विश्वास बसला नाही कारण आजपर्यंत त्यांना फक्त आम्हाला प्लाझ्मा हवा आहे म्हणूनच शेकडो फोन येत होते मात्र आमचा “प्लाझ्मा द्यायचा आहे” असे फोन येणे दुर्मिळच होते असे या संस्थेने सांगितले.

दौंड मधील प्रफुल्ल राजेंद्र बोडखे, कुणाल मंत्री, संगीत बलदोटा, समीर राजोपाध्ये, निखिल शिंदे पाटील, रणजीत पोळ या 

सर्व योद्ध्यांनी प्लाझ्मा दान करत अनेक कोरोना संक्रमित रुग्णांना एक प्रकारे जीवनदान दिले आहे त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत.

वरील योद्ध्यांचे अनुसरण करून कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांनी साधारण 28 दिवसांनंतर आपल्या जवळील ब्लड बँकेशी संपर्क साधून प्लाझ्मा दान करावा आणि आपल्या कोरोना पीडित बांधवाला मदत केल्यास निश्चितच एक आदर्श समाजापुढे उभा राहणार आहे.