ग्रामपंचायत निवडणूक 2023 | उमेदवारी भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी

दौंड : राज्यात ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) कार्यक्रम जाहिर झाला आणि दिनांक १६/१०/२०२३ पासून संगणकप्रणालीव्दारे उमेदवारांची नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवून दिली नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणकप्रणालीव्दारे भरले जात असताना त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्याबाबत सहकारनामा आणि इतर प्रसिद्धी माध्यमांनी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. आयोगाकडे या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सदर तांत्रिक अडचण (maha online) कडून दूर करण्यात आली. मात्र संपूर्ण एकदिवस उमेदवारी अर्ज प्रक्रिया भरण्यास अडचणी आल्याने १८/१०/२०२३ ते दिनांक २०/१०/२०२३ या कालावधीत नामनिर्देशानाची सकाळी ११.०० ते दु. ३.०० वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात आली.

शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी

आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठी झुंबड उडताना दिसत आहे. आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर येत्या २३ ऑक्टोबर ला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर २५ ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असणार आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह आणि त्यांच्या नावांची यादी जाहिर करण्यात येणार आहे.