Categories: पुणे

ग्रामीण भागात शासनाचे ‘दिवाळी किट’ पोहोचले, ‘आनंदाचा शिधा’ मुळे महागाईतही नागरिकांची दिवाळी ‘गोड’

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government) ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha shidha) हे ‘दिवाळी किट’ (Diwali kit) उपलब्ध झाले असून यामुळे महागाईचा चटका सोसणाऱ्या नागरिकांना ऐन दिवाळीत मात्र दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटाचे युतीचे सरकार आल्यानंतर ही पहिलीच दिवाळी (DIWALI) साजरी होत आहे. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरिबांसाठी १०० रुपयांचे खाद्यपदार्थ असलेले दिवाळी किट जाहीर केले होते. या किटला ‘आनंदाचा शीधा’ असे नाव देण्यात आले आहे. या दिवाळी किटमध्ये एक किलो डाळ, एक किलो रवा, एक किलो साखर आणि एक लिटर स्वयंपाकाचे पाम तेल असून हे सर्व 100 रुपयांना देण्यात येत आहे.

याच कार्डधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’ हे ‘दिवाळी किट’

ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळी शिधापत्रिका आहे अश्या सर्वांना हे दिवाळी किट मिळणार आहे असे सरकारने जाहीर केले होते आणि आता ते नागरिकांना उपलब्ध होत आहे. हे दिवाळी किट महाराष्ट्रातील सर्व सरकारी रेशन दुकानातून मिळत आहे. या दिवाळी किटमुळे सर्वसामान्य नागरिकांना ऐन दिवाळीत थोडा का होईना पण दिलासा मिळाला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago