Categories: Previos News

Good Work : शाळा बंद असली म्हणून काय झाले! भोर च्या छोट्या गावातील गावकरी आणि शिक्षकांनी लढवली भन्नाट कल्पना, खा.सुप्रिया सुळेंनीही केले कौतुक

| सहकारनामा |

भोर : भोर तालुक्यातील म्हाळवाडी येथील भिंती मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत गावातील भिंतींवर मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असा मजकूर रंगवून काढला आहे.

यामध्ये गणिताची सुत्रे, इतिहासातील उपयुक्त माहिती यांसह इतर माहितीचा समावेश आहे. याचा गावातील मुलांना फायदा होत असून त्यांची अभ्यासाची गरज देखील पुर्ण होत असून अभ्यासाचे गाव अशी या गावाची ओळख झाली आहे.

या उपक्रमाबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कौतुक केले असून त्यांनी हा अतिशय चांगला व पथदर्शक उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामस्थ व शिक्षकांचे मनापासून कौतुक करून आभार मानले आहेत.

तसेच पुणे जिल्हा परिषदने हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावे, शाळांमध्ये राबविणार असल्याचे स्पष्ट करत याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे व पदाधिकाऱ्यांचेही आभार मानले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago