| सहकारनामा |
भोर : भोर तालुक्यातील म्हाळवाडी येथील भिंती मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत गावातील भिंतींवर मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असा मजकूर रंगवून काढला आहे.
यामध्ये गणिताची सुत्रे, इतिहासातील उपयुक्त माहिती यांसह इतर माहितीचा समावेश आहे. याचा गावातील मुलांना फायदा होत असून त्यांची अभ्यासाची गरज देखील पुर्ण होत असून अभ्यासाचे गाव अशी या गावाची ओळख झाली आहे.
या उपक्रमाबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कौतुक केले असून त्यांनी हा अतिशय चांगला व पथदर्शक उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामस्थ व शिक्षकांचे मनापासून कौतुक करून आभार मानले आहेत.
तसेच पुणे जिल्हा परिषदने हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावे, शाळांमध्ये राबविणार असल्याचे स्पष्ट करत याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे व पदाधिकाऱ्यांचेही आभार मानले आहेत.