| सहकारनामा | अब्बास शेख |
दौंड : संपूर्ण राज्यामध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने (good news for fight against coronavirus) दौंड तालुक्यातही आपले जाळे विणले आहे. गेल्या दिड महिन्यापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण सापडू लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
मात्र हे सर्व होत असताना आता दौंड तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून (good news fight against coronavirus) दौंड तालुक्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये तब्बल 80% रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर राहिलेले 19% रुग्ण हे सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून तेही उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने लवकरच आपल्या निवासस्थानी येतील. यात मृत्यूचे प्रमाण अवघे 1% टक्का असून नागरिकांनी काळजी अवश्य घ्यावी मात्र कुठलीही भीती बाळगून घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
दौंड तालुक्यात दि.22 एप्रिल पर्यंत 2021 पर्यंत 5,908 इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये दि.22 एप्रिल 2021 पर्यंत सुमारे 4,624 इतके कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 1,214 रुग्ण हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात आत्तापर्यंत 70 लोकांचा मृत्यू झाला असून कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यू होण्याचा हा आकडा केवळ 1% टक्के इतका आहे.
दौंड तालुक्याच्या दृष्टीने हि आनंदाची बाब असून (good news fight against coronavirus) नागरिकांनी मात्र हुरळून न जाता सोशल डिस्टनसिंग पाळावे, मास्क चा वापर करावा, हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनिटायजर चा वापर करावा, हस्तांदोलन टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा खोकला, सर्दी, ताप असल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी असे वरील नियम पाळल्यास आपण आणि आपला परिवार निश्चित कोरोनापासून दूर राहील असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.