Good News : शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट! 2400 रुपयांची DAP खतांची बॅग आता 1200 रुपयांना मिळणार



| सहकारनामा |

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले असून आता जवळपास 2400 रुपयांना मिळणारे खत फक्त 1200 रुपयांना मिळणार आहे. याबाबत घोषणा केंद्र सरकारने करताना केंद्र सरकार शेतकर्‍यांचे जीवन सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे. 

म्हणूनच आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ असूनही आम्ही शेतकऱ्यांना जुन्याच दराने खत देण्याचा निर्णय घेतला असून आजच्या निर्णयानंतर डीएपी खताची बॅग 2400 ऐवजी 1200 रुपयांना मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महागाईच्या काळात सध्या शेतकरी आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या खतांच्या किमती वाढल्या असल्या तरी शेती कामांसाठी आवश्यक असणाऱ्या या खतांच्या अनुदानात केंद्र सरकारने तब्बल 140 % एवढे अनुदान दिले आहे. अगोदर हे अनुदान पर बॅग 500 रुपये इतके होते आता त्यामध्ये वाढ करण्यात येऊन तब्बल पर बॅग 1200 रुपये इतके अनुदान करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे 2400 रुपयांना येणारी खताची बॅग आता केवळ 1200 रुपयांना मिळणार आहे.