good news : दौंडमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत आहे घट, उपजिल्हा रुग्णालय व दौंड पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना यश



| सहकारनामा |

दौंड : शहर व परिसरातील कोरोना संसर्गाची साखळी तुटावी व शहर कोरोना मुक्त व्हावे म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना थोडेसे यश मिळत असल्याचे चित्र आज तरी पहावयास मिळत आहे. 

दिनांक 15 मे रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 100 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 83 जणांना दिलासा मिळाला आहे. खूप दिवसांनी दौंड करांसाठी ही दिलासादायक व मनोधैर्य वाढविणारी बातमी आहे.24 ते69 वयोगटातील 11 पुरुष व 6 महिला रुग्णांना संसर्गाची बाधा झाली असून भीम नगर, जनता कॉलनी, लोखंडे वस्ती, सिद्धार्थ नगर, दत्तनगर, वडार गल्ली, घंटा चाळ, गोपाळवाडी, सोनवडी या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. 

शहरामध्ये सुरू असलेल्या लसीकरणा विषयी नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे, लसीकरण केंद्रावर नागरिकांना तासन तास उभे राहूनही लस मिळत नाही अशा तक्रारी येत आहेत. 

याविषयी बोलताना डॉ. संग्राम डांगे म्हणाले की उपजिल्हा रुग्णालय दौंड हे लसीकरण स्थळ, अंतिम सेवा (लस देणारे शेवटचे)  केंद्र  आहे. तालुका आरोग्य अधिकार्यांकडून आम्हाला, त्यांना    जिल्हा परिषदेकडून लसींचा पुरवठा केला जातो. येथे आम्हाला उपजिल्हा रूग्णालयात कधी आणि कोणती लस आणि किती डोस येत आहेत हे माहित नसते म्हणून आम्ही अचूक माहिती देऊ शकत नाही.

लसीच्या तीव्र कमतरतेमुळे, आम्हाला फारच कमी डोस मिळत आहेत, ज्यामुळे दररोज 500 हून अधिक लोकांची गर्दी व्यवस्थापित करणे खूप अवघड आहे. 

उच्च केंद्रांद्वारे डेटा, अॅपवर नोंदणी आणि संबंधित समस्या हाताळल्या जातात म्हणून सर्व दौंडकरांना आवाहन करा, लसीकरणाबाबत धीर धरा, माझ्याकडे 1000 लाभार्थी इंजेक्ट करण्याची क्षमता आहे, परंतु जर मला दररोज 100 डोस मिळत असतील तर 900 लोक असमाधानी असतील. 25 मे पासून सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न असणार आहे असेही डांगे म्हणाले.