ओडिसा मध्ये केडगावच्या मुलींनी दाखवला लावणीचा जलवा

पुणे : जिल्हा संस्कृती परिषद जगतसिंगपूर ओडिसा यांनी आयोजित केलेल्या गौरवशाली विरासत, संस्कृती, कला या कार्यक्रमात महाराष्ट्राकडून भाग घेतलेल्या पुणे (केडगाव) येथील मुलींनी आपल्या लावणीचा जलवा दाखवला आहे. संस्कृतीचे प्रतीक समजला जाणारा हा जिल्हा महोत्सव नवकृष्ण चौधरी स्टेडियम जगतसिंगपूर येथे आयोजित  करण्यात आला होता.

पोलिसानेच नको ते केलं.. अखेर गुन्हा दाखल

या कार्यक्रमासाठी एकूण बारा राज्यातील कलाकारांनी सहभाग घेतला होता. एक एप्रिल ते पाच एप्रिल या दरम्यान घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुण्यातील आर्ट अँड मोशन डान्स स्टुडिओ (केडगाव) येथील मुलींना संधी देण्यात आली होती. या मुलींनी बहारदार लावणी नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवत मने जिंकली. यावेळी उत्कृष्ट नृत्य सादर केल्याने महाराष्ट्र टीम चा सन्मान करण्यात आला.

सर्व टीमला सागर रोकडे सर, रॉबिन मंगलम, तेजस्विनी साळुंखे, धनराज मासाळ यांचे मार्गदर्शन लाभले. उपासना मासाळ, साक्षी शेंडगे, विभावरी तांबे, राशी कटारिया, कार्तिकी नेवसे, श्रावणी वाघ, वृणाली मुथा, अंकिता कुलथे, कु.नराळे राज, गायकवाड साहिल, विटकर कुणाल यांनी लावणी नृत्यामध्ये सहभाग घेतला होता.