Garwa hotel owner Murder detect – अरे रे रे, हा तर निचतेचा कळसच की… हॉटेल ‛गारवा’ मुळे धंदा होत नाही म्हणून रामदास आखाडे यांचा ‛खून’, शेजारील या हॉटेल मालकाने दिली सुपारी!



|सहकारनामा|

पुणे : उरुळी कांचन येथील रामदास आखाडे यांच्या खुनाचे रहस्य अखेर उलगडले आहे. रामदास आखाडे यांचा खून हा व्यवसाय वादातून सुपारी देऊन केला गेला असल्याचे आता पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आखाडे यांच्या हॉटेल गारवामुळे त्यांच्या शेजारी असणारे हॉटेल अशोका हे चालत नव्हते त्यामुळे हॉटेल अशोका च्या मालकाने सराईत आरोपीला सुपारी देऊन रामदास आखाडे यांचा खून केल्याचे समोर येत आहे. 



(मृृृत रामदास आखाडे)


लोणीकाळभोर पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली असून अटक केलेल्यांमध्ये बाळासाहेब जयवंत खेडेकर, निखिल बाळासाहेब खेडेकर, सौरभ उर्फ चिम्या कैलास चौधरी, अक्षय अविनाश दाभाडे, करण विजय खडसे, प्रथमेश राजेंद्र कोलते, गणेश मधुकर साने आणि निखिल मंगेश चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशोका हॉटेल चा मालक बाळासाहेब खेडेकर व त्याच्या मुलाने रामदास आखाडे यांचा खून करण्याची सुपारी त्याचा भाचा सौरभ चौधरी यास दिली होती व त्या बदल्यात आरोपीला दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे कबुल केले होते. याबाबतची माहिती सरकारी वकिलांनी आज न्यायालयात दिल्याची माहिती समोर आली आहे.