Categories: Previos News

Gangster in Pune – गँगस्टर आले पुणे ग्रामिण पोलिसांच्या रडारवर, घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळच्या आवळल्या मुसक्या, पुढचा नंबर कुणाचा!



पुणे : सहकारनामा

मा.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख सो. यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. 

त्या अनुषंगाने घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४ वर्षे, रा.शास्त्रीनगर, कोथरूड पुणे सध्या रा.सोनेगाव ता.जामखेड जि.अहमदनगर ) याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१ (एमपीडीए) कायदयातंर्गत  मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेमार्फत पाठविलेल्या प्रस्तावावर मा.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख सो. यांनी निर्णय घेवून निलेश घायवळ यास एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत.

घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ यास मा.पोलीस अधीक्षक सो. यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून जामखेड जि.अहमदनगर येथून ताब्यात घेवून आज पासून एक वर्ष स्थानबध्द करणेसाठी येरवडा मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली आहे.

स्थानबध्द करण्यात आलेला गुन्हेगार निलेश घायवळ याचेविरुध्द यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, गंभीर दुखापत मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सुमारे ३ महिन्यापूर्वीच निलेश घायवळ व त्याच्या साथीदारां विरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणी चा गुन्हा दाखल झालेला होता.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., पुणे विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.विवेक पाटील सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवण पो.स्टे.चे सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक सचिन काळे, पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, रामेश्वर धोंडगे,

सहा.पोलिस उपनिरीक्षक दतात्रय जगताप, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे, इन्क्लाब पठाण, अंकुश माने यांनी केली आहे.

आगामी काळात पुणे जिल्हयातील वाळू तस्कर, बेकायदा सावकारी करणारे, धोकादायक इसम, मटका किंग, हातभट्टी दारु माफीया व अवैध धंदे, झोपडपट्टी दादा यांचे विरुध्द एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत कडक कारवाई करणार असल्याचे संकेत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.

गँगस्टार गजा मारणे याचा प्रतिस्पर्धी निलेश घायवळ याच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी जगतामध्ये खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी ही कारवाई करताना अत्यंत गोपनीयता बाळगली होती.

पुणे शहर पोलीस गँगस्टार गजा मारणे याच्यावर काय कारवाई करतात याची उत्सुकता सर्वांना आहे.

Sahkarnama

Recent Posts

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

6 तास ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

1 दिवस ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

1 दिवस ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

1 दिवस ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

2 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago