Categories: Previos News

Gang Rape in UP : यूपी पुन्हा सामूहिक बलात्कार आणि महिलेच्या निर्घृण खुनाने हादरले, संशयित बाबा फरार..



नॅशनल : 

यूपी मध्ये नेमकं काय चाललं आहे हे कुणालाच समजेनासं झालं आहे. खून, दरोडे, लूटमार यांसह आता सामूहिक बलात्कारांनी यूपी पुन्हा हादरून गेली आहे.

हाथरसची घटना ताजी असतानाच आता यूपी मधील बदायू जिल्ह्यात एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला असून बलात्कारानंतर त्या महिलेचा निर्घृण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

याबाबत बदायू या जिल्ह्यातील उघैती या गावात असणाऱ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गेल्या रविवारी संध्याकाळी एका  मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र ती गेल्यानंतर पुन्हा घरी आलीच नाही.

त्यानंतर गावकऱ्यांना ती रात्री १२ च्या सुमारास या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. या पीडितेला दोन इसम हे तेथे टाकून कारसह त्यांनी  पोबारा केला होता. या प्रकरणानंतर त्या पीडित मिहिलेचा मृत्यू  झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

यावेळी या महिलेच्या या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करताना याबाबतची तक्रार दाखल करुनही पोलिस स्टेशनचे अधिकारी हे वेळेवर  पोहोचले नसल्याने यातील पीडितेचा मृतदेह १८ तासाने म्हणजे सोमवारी दुपारी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. 

या नंतर मंगळवारी पीएम चा रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना धक्काच बसला कारण या रिपोर्टनुसार पीडितेच्या गुप्तांगांच्या ठिकाणी अनेक जखमा झाल्याचे नमूद करण्यात आले असून या महिलेची बरगडी आणि पाय मोडलेला असल्याचा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या फुप्फुसावर जोरदार प्रहार करण्यात आला असल्याची बाब यात नमूद करण्यात आली आहे.

आलेल्या रिपोर्टनुसार पोलिसांनी आता सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंद केला असून आता गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार करून आरोपींच्या शोधात पाठवली आहेत.

या घटनेत संशयित आरोपी म्हणून महंत बाबा सत्यनारायण त्याचा सहाय्यक वेदराम आणि त्यांचा ड्रायव्हर जसपाल यांची नावे पुढे आली असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. मात्र बाबा आणि त्याचे साथीदार अजूनही फरार आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago