दौंडमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

दौंड : तू आमच्या घरी पोलिस का पाठवले असे म्हणत एका महिलेला पाच जणांपैकी तिघांनी पकडून दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दौंडमध्ये घडली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फिर्यादीने आपल्या फिर्यादित म्हटल्यानुसार, मी वडिलांच्या घरी असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागे लघुशंकेसाठी गेली असता तेथे राजु काळे, त्यांचा मुलगा संदीप राजु काळे, (दोघे रा. वेताळनगर दौंड) सुरज भावड्या पवार (रा. काष्टी, ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) त्यांच्यासोबत असलेला निलेश जितेंद्र चव्हाण व जितेंद्र चव्हाण (दोघे रा. गिरीम ता. दौंड) हे सर्व घराच्या पाठीमागे आले. यावेळी राजु काळे याने मला जबरीने उसात उचलून नेले आणी तू आमच्या घरी पोलीस कशाला पाठवले असे बोलून दमदाटी करू लागला.

तेव्हा मी पोलीस पाठवले नाही असे त्यांना सांगीतले तरी राजु काळे व निलेश चव्हाण या दोघांनी माझे अंगावरचे कपडे बळजबरीने काढले. त्यानंतर संदीप काळे, जितेंद्र चव्हाण व सुरज पवार या तिघांनी मला पकडून जमीनीवर खाली पाडले आणी राजु काळे व निलेश चव्हाण या दोघांनी माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्यांनतर 08:40 वाजता मला सोडून दमदाटी करून निघून गेले असे फिर्यादीने आपल्या फिर्यादित म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक पवार हे करीत आहेत.