Categories: Previos News

fungal infection : म्युकर मायकोसीस आजाराच्या पार्श्वभूमीवर दौंडमध्ये डोळे व दंत तपासणी शिबिराचे आयोजन



|सहकारनामा|

दौंड : (अख्तर काझी)

कोरोनाने सर्वत्र कहर केला असताना आता म्युकर मायकोसीस या अत्यंत भयावह आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोना पाठोपाठ या आजाराचा ही सर्वत्र प्रादुर्भाव होत आहे. 

या  पार्श्वभूमीवर नगरसेविका हेमलता परदेशी व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण परदेशी यांच्या पुढाकाराने, स्वराज्य नागरी पतसंस्थेच्या वतीने व नेत्रतज्ञ डॉ. प्रेम कुमार भट्टड, दंत चिकित्सक डॉ. दीपक जाधव यांच्या सहकार्याने दौंडमध्ये दिनांक 24 मे रोजी मोफत डोळे व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. म्युकर मायकोसीस हा सध्याचा घातक आजार आहे, या आजाराची बरीच लक्षणे ही डोळे आणि दातां मार्फतच दिसत आहेत. 

लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावे या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कोरोना मुक्त होऊन 20 दिवस पूर्ण झालेल्या रुग्णांनी व ज्यांना मधुमेह व रक्तदाबाचा आजार आहे अशा रुग्णांनी शिबिरामध्ये तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रवीण परदेशी यांनी केले आहे. 

दि.24 मे रोजी दु. 4 वा. शिवाजी चौकातील पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये शिबिर संपन्न होणार आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago